Tuesday, February 22, 2011

मराठी कॉर्नर वरिल "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११"

नमस्कार मित्रांनो! आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय! आपल्या लाडक्या मराठी कॉर्नरने एक लेखमाला स्पर्धा आयोजित केली आहे आणि विजेत्याला रुपये १००/- चे बक्षिसही ठेवले आहे! मग मिळवणारना बक्षिस??? हा हा!! अर हो! थांबा! सांगतो! सगळी माहिती व्यवस्थित सांगतो!


मराठी कॉर्नर नेमके आहे तरी काय?
थोडक्यात माहिती
१. साईटचं नाव: Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम
२. साईटचा उद्देश व कार्यपद्धती: एकदम सहज, साधी, सोपी आणि मुख्यतः मराठीसाठी काम करणारी अशी ही वेबसाईट आहे. केवळ मराठीसाठी म्हणून इतर भाषांचा अपमान करणे वा इतर भाषांचा तिरस्कार करणे या मताचे हे लोक नाहीत. हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की आज मराठी ब्लॉगर "ब्लॉगिंग" या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत जे खरोखरच खुप चांगले आहे. त्यामुळे अशा सर्वांना कोठेतरी एकत्र आणणे गरजेचे आहे जेणे करून सर्व मराठी लोक एका छताखाली एकत्र येतील, एकत्र विचरांचे आदान-प्रदान करतील, त्यांची मते मांडतील, गप्पा गोष्टी करतील, २ क्षण आनंदात घालवतील. थोडक्यात इंग्रजीत म्हणायचे झालेच तर "virtual online gate to gather". इथे कोणत्याही प्रकारे राजकीय, जातीय वा अश्लील लेखनाला मात्र जागा मिळणार नाही.
  लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ नेमकी आहे तरी काय?
लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ ही स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. मराठी कॉर्नरच्या सभासदांच्या विचारांना चालना देण्यासाठी हा उपक्रम मराठी कॉर्नरने आखला आहे. या स्पर्धेचे नियम मराठी कॉर्नरवर www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284 येथे दिले आहेत ते मी जसेच्या तसे येथे पोस्ट करतो!

 लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११
लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ ही मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. आशा आहे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल. या स्पर्धेत काही नियमही असतिल आणि हे नियम पाळणे सर्व सहभाग घेणार्‍या सभासदांना बंधनकारक असतिल.
या नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास तो सभासद स्पर्धेतून बाद होईल.




नियम

१.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी विषयाचे कोणतेही बंधन नाही.

२.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी शब्दमर्यादा ही "एका पोस्ट मध्ये बसतील तितके शब्द" अशी असेल. एक पेक्षा जास्त पोस्ट टाकल्या तर तो लेख बाद घोषित केला जाईल. (एका पोस्टमध्य इंग्रजी ६०,००० characters बसतात. मराठी exact किती बसतील हे सांगू शकत नाही! :) )

३.प्रत्येक सभासदाला केवळ एकच लेख देता येईल. त्यामुळे तुमचा कोणताही सगळ्यात चांगला लेख या स्पर्धेत द्यावा.

४.लेख आधी प्रसिद्ध झालेला, किंवा छापलेला असला तरी चालेल पण तो तुमचा असणे गरजेचे आहे.

५.लेखात फोटो वगैरे चालेल फक्त लिंक देताना जर गरज असेल तरच द्यावी अन्यथा अशा लिंक्स "Spam" ठरवल्या जातिल!

६.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ मध्ये सहभागी होणारे लेख हे तुमचे स्वतःचे असावेत! संकलित/संग्रहित लेख किंवा चोरलेले असे लेख जर दिसून आले तर तो सभासद स्पर्धेतून बाद घोषित केला जाईल.

७.प्रत्येक सहभागी सभासदाने आपापला लेख "NEW TOPIC" म्हणून टाकावेत. दुसर्‍या सभासदांच्या लेखाला REPLY म्हणून टाकू नये!(थोडक्यात प्रत्येकाने सहभाग घेताना नवा धागा सुरू करावा. दुसर्‍याच्या धाग्यात मांडू नये!)

८.अश्लील विषय, पक्षीय राजकारण (घोटाळ्यांवर वगैरे चालेल पण एखाद्यावर उद्देशुन लेखन नको!), धार्मिक किंवा जातीय विषय (हे प्रकर्षाने टाळा!) ,प्रक्षुब्ध लिखाण, वैयक्तिक उणी दुणी काढणारे लिखाण, प्रचारात्मक लिखाण, तसेच बोचक टीका इ. गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात किंबहुना असे विषय इथे निषिद्ध आहेत.

९.परिक्षकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल आणि तो सर्वांनी खिलाडू वृत्तीने स्विकारावा ही अपेक्षा.(परिक्षकांची नावे आत्ता जाहिर केली जाणार नाहित!)

१०.संचालक मंडळातिल सदस्य या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहित.

११.स्पर्धेचा कालावधी हा दिवसांवर नसेल तर कमित कमी १० लेख सहभागी झाले की त्या नंतर १० दिवस असा राहिल! (अजून अंदाज येत नसल्याने असा कालावधी ठेवला आहे! :D )

१२.http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36 येथे पोस्ट केलेलेच लेख या स्पर्धेत ग्राह्य धरले जातिल!


बक्षिसे
१.विजेत्या सभासदाला रुपये १००/- चे बक्षिस देण्याचे योजले आहे. हि रक्कम मनी ऑर्डरने किंवा मोबाईल रिचार्ज या पद्धतिने दिली जाईल. मनी ऑर्डर करताना लागणारी फी बक्षिसाच्या रकमेतूनच घेतली जाईल तसेच जर मोबाईल रिचार्ज हा पर्याय निवडला तर जास्तीत जास्त १०० रुपयांचा रिचार्ज केला जाईल. त्यातून मिळणार्‍या टॉकटाईमच्या रकमेचा यात विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.

२.सध्या केवळ "पहिला क्रमांक"च काढण्यात येईल.

३.सर्व सभासदांना आणि विजेत्याला "ई सर्टिफिकेट" देखिल मिळेल. ते त्यांना मेल केले जाईल.



*या नियमांत कोणत्याही क्षणी बदल केला जाऊ शकतो याची सर्वांनी दखल घ्यावी.
आणि हो, तुम्ही मराठी कॉर्नरचे सभासद असणे तर आवश्यक आहेच! :D मग तुम्ही भाग घेणार ना? तुम्हाला काही शंका असतिल तर Comment टाका, मी आवश्य निर्सन करण्याचा प्रयत्न करेन!

आपला,
अद्वैत!
marathi

No comments:

Post a Comment

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...